23.1 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

कर्ज करून लग्नात पैसा उधळणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं:साहिल आर.रामटेके

◾कर्ज करून लग्नात पैसा उधळणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं:साहिल आर.रामटेके

भंडारा
आयुष्याची सगळी कमाई दोन दिवसात फुंकायची आणि वर्षानुवर्ष कर्ज फेळत बसायचं,हे काही शहाणपण नाही! लोक काय म्हणतील म्हणून बँक बॅलन्स शून्यावर आणणारे किती तरी जण बघितलेत.दहा-पंधरा लाख उडवून टाकतात,यापुढे स्वतःच्या घरासाठी किंवा व्यवसायासाठी हातात दमडीही राहत नाही.
आजच्या काळात लग्नाचा खर्च म्हणजे डेकोरेशन,महागड्या प्लेट,फ्री-वेडिंग शूट,सोन्याचे दागिने,डेस्टिनेशन वेडिंग हा सर्व दिखावा करायचा, पण नंतर होते फेडत बसायचं! आणि पर्सनल लोन घेऊन लग्नाचा शाही खर्च करतात. एका दिवसाचा शो ऑफ आणि मग वर्षाने वर्ष ई.एम.आय. चा जंजाळ!
खरी श्रीमंती काय असते? लग्नानंतर पाठीशी सेविंग असणे. स्वतःचा घर असणे,गुंतवणूक असणे,गरज पडली तर बँकेमध्ये पैसे असणे. आज लोकांना इम्प्रेस करण्यासाठी उधळपट्टी करणार पण? दोन वर्षांनी पैशाची अडचण आली की ते लोक मदतीला येणार आहे का??
लग्नाला खर्च करा पण डोकं वापरून! दिसायलाही छान आणि फ्युचर पण शेफ ठेवायचं, हे कसं करता येईल याचा विचार करा. नाहीतर “तेव्हा भारी लग्न केलं पण आता सध्या खिशात रुपयाही नाही” असं म्हणत बसायचं!

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या