➡️चोरीस गेलेली मोटरसायकल आणि आरोपी अवघ्या 24 तासात ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची रॅपिड कारवाई !
परळी / प्रतिनिधी
संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली एमएच-44 डब्ल्यू-3827 ही मोटरसायकल अवघ्या २४ तासांत हस्तगत करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्याचा पर्दाफाश केला आहे.
पोलीस स्टेशन संभाजीनगर हद्दीतील गु.र.नं. 127/2025, कलम 303(2) BNS अंतर्गत चोरीस गेलेली एमएच-44 डब्ल्यू-3827 ही मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी शहरातील सिद्धार्थनगर परिसरातून जप्त केली आहे.
या प्रकरणात मनोज माणिक करडे (रा. ब्रह्मवाडी, ता. परळी) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून अंदाजे ₹35,000 किमतीची चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकाऱ्यांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल व आरोपी यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. रामचंद्र केकान, पो.ना. गोविंद भताने व पो.कॉ. सचिन आंधळे यांनी केली.