शिवसेनेच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या संवाद बैठकीचे आज परळीत आयोजन : तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
राज्यभरात होऊ घातलेल्या आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या संवाद बैठकीचे आयोजन आज, दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 04 : 00 वाजता करण्यात आले आहे. ही बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, परळी वैजनाथ या ठिकाणी पार पडणार असून या बैठकीस परळी नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या राज्यभर नगरपालिका तथा नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर परळी तालुका शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने आज नगरपरिषद लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक यांची प्रमुख उपस्थित लाभणार असून जिल्हाप्रमुख सचिन भैय्या हे यावेळी शिवसैनिकांना तथा इच्छुक उमेदवारांना संबोधित करणार आहेत. इच्छुक उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया, पक्षाची भूमिका आणि स्थानिक संघटनात्मक कामकाज याबाबतही यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच नगरपरिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची व इच्छुक उमेदवारांची भूमिका ठरविण्यावर या बैठकीत चर्चा होणार असली ची माहिती परळी तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.
या संवाद बैठकीचे आयोजन तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आणि शहरप्रमुख वैजनाथ माने यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून शिवसैनिक तथा इच्छुक उमेदवारांची ही संवाद बैठक आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी ठीक 04 : 00 वाजता शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक या ठिकाणी होणार आहे. तरी या बैठकीस सर्व शिवसैनिक आणि इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे तथा शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी केले आहे.









