परळीत ६ जानेवारी रोजी दर्पण दिन; नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांना निमंत्रण
सत्य निर्भीडता व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरव करणारा कार्यक्रम
परळी : प्रतिनिधी
परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने येत्या ६ जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आज परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
यावेळी मा. नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, परळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रानबा गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष नितीन ढाकणे, शहराध्यक्ष शेख मुकर्रम, सहसचिव शेख मुदस्सिर, सल्लागार भगवान साकसमुद्रे आदीजण उपस्थित होते.
दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकारितेतील सत्य, निर्भीडता व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरव करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असून या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांनी शुभेच्छा देत उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.









