-1.2 C
New York
Friday, February 6, 2026

Buy now

सिरसाळा पोलिसांची धडक कारवाई आठवडी बाजारात गोमांस विक्री करणाऱ्यांवर छापा

सिरसाळा पोलिसांची धडक कारवाई
आठवडी बाजारात गोमांस विक्री करणाऱ्यांवर छापा
सिरसाळा (प्रतिनिधी): सिरसाळा येथील आठवडी बाजारात अवैधरित्या गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सिरसाळा पोलीस स्टेशनच्या पथकाने धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मांस जप्त करण्यात आले असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आठवडी बाजारात मोठी गर्दी असताना काही विक्रेते लपूनछपून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले मांस तपासणीसाठी पशुवैद्यकीय विभागाकडे पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध प्राणीसंवर्धन व अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सिरसाळा पोलीस करत आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अवैध कत्तल व मांसविक्री रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणाबाबत अधिकृत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पोलिसांकडून अधिकृत खुलाशाची प्रतीक्षा आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या