0.6 C
New York
Friday, February 13, 2026

Buy now

देशव्यापी कामगार संपाला परळी वैजनाथमध्ये प्रतिसाद — बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सहभागी

देशव्यापी कामगार संपाला परळी वैजनाथमध्ये प्रतिसाद — बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सहभागी

 

देशव्यापी कामगार संपाला परळी वैजनाथमध्ये प्रतिसाद — बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सहभागी

परळी वैजनाथ :-

*केंद्र सरकारने लागू केलेले चार कामगार कायदे तात्काळ रद्द करावेत या प्रमुख मागणीसह विविध कामगार संघटनांच्या वतीने आज (दि. १२ फेब्रुवारी) देशव्यापी कामगार संप पुकारण्यात आला. भारतीय मजदूर संघ व त्याच्या संलग्न संघटनांव्यतिरिक्त इतर सर्व केंद्रीय कामगार संघटना व उद्योगनिहाय फेडरेशन्स यांनी या संपात सहभाग नोंदविला.*

या संपामुळे बँकिंगसह अनेक उद्योगांचे कामकाज ठप्प झाले. आयडीबीआय बँकेच्या प्रस्तावित खाजगीकरणाला विरोध, खाजगी बँकांमधील विदेशी भांडवल मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाला विरोध तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील विदेशी भांडवल मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत नेण्याच्या धोरणाला विरोध अशा विविध मागण्यांचाही यात समावेश होता.

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी कामगारांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.

या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कर्मचाऱ्यांनीही संपात सक्रिय सहभाग घेतला. कर्मचारी भाग्यश्री साखरे, पूजा देशमुख, प्रिया साबणे, मीना जोशी, दीपक घाडगे व शिवरत्न आघाव यांनी संप यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदविला.

या संपामुळे दिवसभर बँकिंग व्यवहारांवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

 

 

 

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या