9.5 C
New York
Saturday, April 25, 2026

Buy now

लाचखोर चकलांबा ठाणेदार पाटील आणि कर्मचारी सुरवसे एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर चकलांबा ठाणेदार पाटील आणि कर्मचारी सुरवसे एसीबीच्या जाळ्यात

५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले

 

बीड : अवैध वाळू वाहतुकीसाठी परवानगी देण्यासाठी दरमहा हप्ता घेणाऱ्या चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील आणि कर्मचारी विनोद सुरवसे यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.१०) रात्री सुमारे १० वाजता ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळू वाहतूक विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ६० हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे हे पैसे घेण्यासाठी कर्मचारी विनोद सुरवसे उमापूर पोलीस चौकीत उपस्थित होता.

दरम्यान, बीड ACB च्या पथकाने सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरवसेला ताब्यात घेतले, तर प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनाही ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई ACB चे पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या