2.9 C
New York
Friday, March 20, 2026

Buy now

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – संतोष वसंत व्हावळे

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – संतोष वसंत व्हावळे

परळी –

परळी विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता, राख उपयोगिता मुजोर अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी राखेच्या टेंडर प्रक्रियेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून करोडो रुपयांची राख नाममात्र पैशावर दाऊतपूर ग्रामपंचायतला कशामुळे दिली? एवढी सोपी गोष्ट समजायला परळीची जनता काय वेडी राहिलेली नाही. 2023 मध्ये प्रति टन 353 रुपये भाव असताना 2026 मध्ये फक्त 177 रुपयांमध्ये प्रति टन राख देऊन वरील संबंधित अधिकाऱ्याने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. आमचे नेते मिलिंद घाडगे यांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये राख टेंडर प्रक्रिया च्या चुकीच्या पद्धतीवर निवेदन दिल्यामुळे विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंताने टेंडर पद्धत सार्वजनिक केल्यामुळे हाच राखेचा 60 टक्के टेंडर प्रक्रियेचा लिलाव दिनांक 17 /03/2026 रोजी झाला असता याच राखेचा रेट प्रति टन 1921 रुपये झाला आहे याचा अर्थ या भ्रष्टाचारी मुख्य अभियंत्याने व संबंधित अधिकाऱ्याने दाऊतपूर ग्रामपंचायतला 177 रुपये प्रमाणे दिल्यामुळे 100 ते 150 करोडो रुपयाचा शासनाचा महसूल बुडाला आहे.

तर ग्रामपंचायत दाऊतपूरला जवळपास 400 ते 500 कोटी रुपयांचा फायदा आजच्या बाजारभावाप्रमाणे या मुख्य अभियंत्याने करून दिला आहे याची सखोल चौकशी करून दाऊतपूर ग्रामपंचायत असेल किंवा वीज विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता अधिकारी कर्मचारी असतील यांच्याकडून हा महसूल वसूल करून यांना तात्काळ निलंबित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 20 /3 /2026 रोजी सकाळी 10.00 वाजता परळी येथील छत्रपती संभाजी चौक (ईटके कॉर्नर) परळी वै. येथे प्रचंड रास्ता रोको आंदोलन ठेवले आहे. तरी सर्व सुजाण नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडी युवा तालुका उपाध्यक्ष संतोष वसंत व्हावळे यांनी केले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या