अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी शिवराज काटकर
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या नूतन राज्याध्यक्षांचा सत्कार
सांगली | प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या नूतन राज्य अध्यक्षपदी शिवराज काटकर यांची निवड करण्यात आली. सांगली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख होते. यावेळी विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, मावळते राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे आणि कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख यांची उपस्थिती होती.
शिवराज काटकर यांची राज्य अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, छत्रपती संभाजीनगर विभागीय संघटक सुभाष चौरे, बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, विभागीय सचिव रवि उबाळे तसेच डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
नूतन राज्य अध्यक्ष शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या विविध प्रश्नांना आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील आव्हानांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी संघटना अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.









