5 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

ब्लॉकबस्टर ‘बाईपण भारी देवा’! 31 दिवसांत पार केला 70 कोटींचा टप्पा

ब्लॉकबस्टर ‘बाईपण भारी देवा’! 31 दिवसांत पार केला 70 कोटींचा टप्पा                                               मुंबई वृत्तसंस्था :
या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. देशासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवत आहे. 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आता 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बाईपण भारी देवा’ या सिनेमाची स्टारकास्ट तगडी आहे. सिनेमाचं दिग्दर्शन, कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. महिला प्रेक्षकांना हा सिनेमा भावल्याचं पाहायला मिळत आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कार्यक्रम आणि कलाकृती महिलांनी डोक्यावर उचलून धरले आहेत. होम मिनिस्टर, माहेरची साडी, चिमणी पाखरं या सिनेमांच्या यादीत आता ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा समावेश झाला आहे. बाईपण भारी देवा’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या…

‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने रिलीजच्या 31 दिवसांत 71.68 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 12.4 कोटी, दुसरा आठवडा 24.95 कोटी, तिसरा आठवडा 21.24 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 10.27 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 71.68 कोटींचा गल्ला जमवला आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने  रिलीज आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी देवा’ सिनेमानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा सिनेमा प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या