18.1 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

दहशतवाद हल्ल्याप्रसंगी करावयाच्या कार्यपध्दतीची रंगीत तालीम (Mock Drill)

  • दहशतवाद हल्ल्याप्रसंगी करावयाच्या कार्यपध्दतीची रंगीत तालीम
    (Mock Drill)

बीड :
बीड जिल्हा पोलीस दलाचे वतीने दहशतवादी हल्ल्या प्रसंगी
करावयाची कार्यपध्दतीची रंगीत तालीम प्रात्यक्षिक हे आकाशवाणी केंद्र, बीड येथे घेण्यात आले.
बीड जिल्हा पोलीस दलाचे वतीने आज दिनांक 31/07/2023 रोजी 15.35 ते 17.15 वा. दरम्यान बीड शहरातील पो.स्टे. पेठ बीड हद्दीत असलेले अतिमहत्वाचे मर्मस्थळ
असलेले आकाशवाणी केंद्र, बीड, ता.जि. बीड ( ब वर्गवारी) या ठिकाणी मा. पोलीस अधीक्षक सो. बीड यांचे मार्गदर्शनखाली दहशतवादी हल्लयाच्या प्रसंगी प्रसंगावधान राखुन,
करावयाच्या प्रमाणित कार्यपध्दतीची (SOP) प्रमाणे रंगीत तालीम घेण्यात आली. सदर ठिकाणी स्वत: अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सचिन पांडकर यांनी भेट देवून सदरची
कारवाई त्यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर रंगीत तालीम (Mock Drill) दरम्यान आकाशवाणी केंद्र, बीड येथे अज्ञात इसमाने बॉम्ब सदृष्य वस्तू ठेवले बाबतची माहिती प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.
काशिद, पो.स्टे. पेठ बीड यांनी पोलीस नियंत्रण कक्ष बीड यांना 15.35 वा. दिली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष बीड यांनी सदरची माहिती पोलीस अधीक्षक सो. बीड यांना
देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवादी हल्ला विरोधी कारवाई चे अनुषंगाने संबंधित दहशतवाद विरोधी शाखा बीड, जलद प्रतिसाद पथक, दंगल विरोधी पथक, बॉम्ब शोधक व
नाशक पथक, श्वान पथक, अंगुली मुद्रा व तपासणी पथक, स्थानिक पोलीस स्टेशन, जिल्हा
रुयग्णालय, मा. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष, फायर ब्रिगेड व्हॅन अधिकारी व कर्मचारी
यांना माहिती देवून घटनास्थळी पाचारण केले. सदरच्या माहितीच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी शाखा, जलद प्रतिसाद पथक, दंगल विरोधी पथक असे तात्काळ आप-आपले अधिकारी व अंमलदार शस्त्र व सुरक्षासाहित्यासह आकाशवाणी केंद्र, बीड येथे वेगवेगळया पथकासह वेगवेगळया मार्गाने प्रवेश
केला व संपुर्ण आकाशवाणी केंद्रास घेराव घातला. सदर ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक बीड हे घटनास्थळावर हजर आले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली संबंधित पथकातील सर्व
पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी व स्थानिक पोलीस स्टेशनमधील पोलीसांच्या मदतीने
आकाशवाणी केंद्र बीड या घटनास्थळावरील लोकांची गर्दी बाजूला करुन आकाशवाणी केंद्राचे टॉवर खाली बॉम्ब सदृश्य वस्तू असलेल्या घटनास्थळावरील ठिकाण संरक्षित केले.
त्यानंतर बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाचे सहायाने सदर बॉम्ब सदृश्य वस्तुची व परिसराची तपासणी केली. तसेच फॉरेन्सिक टिमच्या वतीने देखील घटनास्थळाची व वस्तूची
पाहणी करुन तपासणी केली. त्यानंतर सदरचे परिसरातील नागरिकांना सदर घटनेच्या अनुषंगाने सर्व परस्थिती ही पोलीसांच्या नियंत्रणात असुन कोणीही नागरिकांनी भयभीत होवू नये व सदरची कार्यवाही रंगीत तालीमचे प्रात्यक्षिक असले बाबत स्पिकरद्वारे सुचना देवून
कळविले. सदरची दहशतवाद हल्ल्याप्रसंगी करावयाच्या कार्यपध्दतीची रंगीत तालीम (Mock Drill) मध्ये मा.पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बीड, दहशतवाद विरोधी शाखा बीड, जलद प्रतिसाद पथक, दंगल विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, अंगुली मुद्रा व तपासणी पथक, स्थानिक पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार व जिल्हा रुग्णालय बीड, फायर ब्रिगेड व्हॅन
येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या