मणिपूर राज्यातील हिंसाचार व महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ परळीत इंडिया समन्वय समितीचे भव्य रॅली व निषेध सभा संपन्न
परळी वै ता.४ प्रतिनिधी
मणिपूर येथील गेल्या तीन महिन्यापासून चालू असलेला हिंसाचार आणि महिलांची नग्न धिंड काढून करण्यात आलेला अत्याचार यांच्या विरोधात केंद्र सरकारनी मनिपुर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी इंडिया व समन्वय समितीच्या वतीने परळीत शुक्रवारी (ता.४) भव्य रॅली काढून मोंढा मार्केट येथे निषेध सभा घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई म्हणाले की, मणिपूर येथील घटनेस केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. माकप चे जिल्हा सचिव कॉ. अजय बुरांडे यांनी देशात ज्या ज्या वेळी महिलावर अन्याय अत्याचार झाला तेंव्हा देश एकजूट झाला आणि अशा अन्याय अत्याचाराला पाठशी घालणाऱ्या सरकारला धडा शिकवला असे प्रतिपादन केले.
मणिपूर येथील हिंसा व महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आज शुक्रवारी (ता.४) सकाळी ११:०० वाजता राणी लक्ष्मीबाई टावर येथून भव्य अशा निषेध रॅलीला सुरुवात झाली. मनिपुर वाचवा देश वाचवा, संविधान बचाव देश बचाव, जवाब दो मोदी सरकार जवाब दो, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा. अशा प्रकारचे घोषणा फलक हातात घेऊन रॅलीमध्ये कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर रॅली टॉवर येथून सुरुवात होऊन तशीच सरळ मोंढा मैदानातील विजयी स्तंभाजवळ पोहोचली. या ठिकाणी भव्य अशी निषेध सभा पार पडली.
यावेळी उपस्थित पुरोगामी पक्ष व संघटनेच्या नेत्यांनी आपले विचार मांडले. मणिपूर येथील घटनेचा निषेध करून येणाऱ्या काळामध्ये जातीवादी आणि महिलांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या भाजपाला हद्दपार करण्याचे आवाहन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिलिंद घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वतीने जमील अध्यक्ष, अर्जुन सोळंके, दलित महासंघाच्या वतीने बालाजी गायकवाड, माकपाच्या वतीने पांडुरंग राठोड, किसान सभेच्या वतीने भगवान बडे, काँग्रेसच्या वतीने ऍड. अनिल मुंडे, विजयप्रसाद अवस्थी, ऍड अर्जुन सोळंके, पत्रकार रानबा गायकवाड, इंजिनिअर भगवान साकसमुद्रे, मनोज गीते, गुलाबराव देवकर, यांनी आपले विचार मांडले व मणिपूर येथील घटनेचा जाहीर निषेध केला.
या निषेध रॅली व निषेध सभेत प्रकाश देशमुख, सुभाष देशमुख, ऍड. परमेश्वर गीते, प्रा. बी.जी. खाडे, दीपक शिरसाठ, ऍड. प्रकाश मुंडे, शशी चौधरी, किरण सावजी, नरेश हालगे, एजाज भाई, मेहबूब कुरेशी, रणजीत देशमुख, वैजनाथ गडेकर, एजाज भाई, रसूल खान, सद्दाम शेख, फारुख उर्फ बाबू, चांद मेहबूब, शेख सलीम, अशोक कांबळे, अजय पिंपळे आदी उपस्थित होते. निषेध सभेचे प्रास्ताविक नवनाथ दाने यांनी केले. तर आभार प्रदर्शन पांडुरंग राठोड यांनी केले. या निषेध रॅली व निषेध सभेत परळी तालुक्यातील पुरोगामी विचाराचे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.