2 C
New York
Saturday, January 18, 2025

Buy now

परळी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश

परळी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश

◼️नूतनीकरणासाठी १३ कोटी ५ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर

◼️पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन

बीड :  बीडच्या परळी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेतून नूतनीकरणासाठी १३ कोटी ५ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून परळी रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम केले जाणार असून यामुळं स्थानकाचा काहीसा कायापालट होणार आहे.

दक्षिण- मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात परळीसह १६ रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश केला आहे. रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजना जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येणाऱ्या ६ ऑगस्टला ऑनलाइन अमृत भारत स्टेशनच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तर परळी येथील रेल्वे स्टेशनवर ६ ऑगस्टला भूमिपूजन सोहळ्याला खासदर प्रीतम मुंडे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाचे रेल्वे प्रबंधक भरतेश कुमार जैन यांनी पत्राद्वारे दिली आहे.
दरम्यान या योजनेद्वारे रेल्वेस्थानक  परिसरातील वाहतूक सुधारणा, परिसर सुशोभीकरण, प्रतीक्षागृह उभारणे व सुधारणा, स्वच्छतागृहामध्ये सुधारणा व अन्य विकासकामे होणार आहेत; अशी माहिती रेल्वे वाणिज्य अधिकारी संतोष चिघळे यांनी दिली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या