0.4 C
New York
Thursday, January 1, 2026

Buy now

चेतना तिडके मॅडम यांनी स्वीकारला अप्पर पोलिस अधीक्षक पदाचा पदभार

चेतना तिडके मॅडम यांनी स्वीकारला अप्पर पोलिस अधीक्षक पदाचा पदभार

बीड | प्रतिनिधी

निवडणूकीच्या अनुषंगाने सध्या प्रशासनातील अधिकार्‍यांच्या बदल्या सुरू आहेत. नुकत्याच पोलिस खात्यातील अधिकार्‍यांच्याही बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांची मुंबई येथे सायबर पोलिस अधीक्षक म्हणून बदली झालेली आहे, तर त्यांच्या जागी नागपूर येथे  पोलिस उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावणार्‍या चेतना तिडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार तिडके यांनी गुरूवारी अंबाजोगाई अप्पर पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे, यावेळी एएसपी कविता नेरकर यांनी तिडके यांच्याकडे  पदभार सोपवून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या