19.3 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

मराठी पत्रकार परिषद आणि माहूर गडाचा प्रवास

मराठी पत्रकार परिषद आणि माहूर गडाचा प्रवास

माहूरगड : विशेष
मुख्य संपादक नितीन ढाकणे

माहूर गडाकडे येत असताना प्रवास दूरचा असला तरी उत्सुकता होती ,सर्व पत्रकार बांधवांच्या भेटीची आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची, विशेषतः एस एम देशमुख सरांचे विचार ऐकण्याची, रात्रीचे 2 वाजून 50 मी होत आहेत. हदगाव हुन उमरखेड मामार्गे माहुरगड, कडे मार्ग आहे.

प्रवाहात अनेक जुन्या गाण्यांसोबतच , गप्पा गोष्टी करत करत माहूर गडाच्या जवळ जवळ येत आहोंत याचा मनात कुतुहल ही होतच,

नवनवीन विषय ,विविध पत्रकार संघ, नवनवीन विचारांची देवाणघेवाण हा माझ्यासाठी शिकण्याचा विषय होणार याची तयारी करून , आमचे मार्गदर्शक अनिलजी वाघमारे , जितेंद्रजी शिरसाठ, यांच्याशी संवाद साधून आम्ही परळीतील सहकारी प्रवासी पत्रकार मित्र मार्गदर्शक ,जेष्ठ पत्रकार आणि आमचे समन्वयक आणि पत्रकार संघाचेही समन्वयक धनंजयजी अरबुने काका, जेष्ठ पत्रकार आत्मलिंगजी शेटे सर, धीरजजी जंगले, जगदीशजी शिंदे सर, दत्ताजी शिवगण सर, तडफदार पत्रकार अभिमन्यू फड, सर्व सहकारी वामकुक्षी घेत घेत सावध होत होत बोलत होते, त्यांच्याही मनामध्ये माझ्याप्रमाणे कार्यक्रमाची उत्सुकता असेलच ,

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या