मूड चांगला असेल तर चॉकलेट आणि चांगला नसेल तरी चॉकलेट. प्रेमापासून ते प्रपोज करण्यापर्यंतचा प्रवास चॉकलेटनेच सुरु होतो. हेच कॉफीबाबत सांगता येईल . तर तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कॉफी पिण्याचे कोणतं ना कोणतं कारण असतं. पण तुम्हाला माहित आहे का की, चॉकलेट आणि कॉफी आणि शरिरीसाठी किती फायदेशीर आहे? किंवा शरिरासाठी किती घातक आहे? तुम्हाला यापैकी एक किंवा दोन्ही गोष्टींचे व्यसन लागले असेल तर ते तुमच्यासाठी घातक ठरु शकतं. एखाद्या व्यक्तीला 4 कप कॉफी प्यायल्यानंतर जेवढे कॅफिन मिळते. तेवढेच 7 चॉकलेट खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला कॅफीन मिळते.
कॉफी पिण्याचे फायदे
कॉफीमध्ये कॅफिन असते. कॅफिनमुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय एक कप कॉफीने थकवाही दूर होतो. कॉफी प्यायल्याने शरीरातील चयापचय दर 10 टक्क्यांनी वाढतो, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.