22.6 C
New York
Friday, April 25, 2025

Buy now

जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल

जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल

कुठेही फिरण्यासाठी जायचं म्हटलं की सगळ्यात जास्त खर्च येतो तो हॉटेलमध्ये राहण्याचा. अलीकडेच एक नवीन ट्रेंड समोर आला आहे. निसर्गरम्य ठिकाणी रिसॉर्ट उभारले जातात. या रिसॉर्टमध्ये पर्यटकांसाठी खास सोयी उभारल्या जातात. जितक्या जास्त सोयी तितकेच याचे पैसेही अधिक घेतले जातात. तसं पाहायला गेलं तर हॉटेलची लोकप्रियता ही स्टार्सवरुन ठरली जाते. फाइव्ह व सेव्हन स्टार हॉटेलचे दरही तितकेच असतात. पण तुम्हाला माहितीये का, जगात एकच 10 स्टार हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्याचे लाखो रुपये द्यावे लागतात.

दुबई हे जगातील अनेकांचे आकर्षण आहे. जगातील उंचच उंच इमारती आणि वास्तुशिल्प पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करतात. दुबईतच 10 स्टार हॉटेल आहे. बुर्ज अल अरब असं या हॉटेलचे नाव आहे. हे एकमात्र 10 स्टार हॉटेल आहे. एका आर्टिफिशियल आयलँडवर असलेले हे वास्तुशिल्प जुमेराह नजीक बांधण्यात आले आहे. दुबईच्या शानदार स्कायलाइनवर असलेले बुर्ज अल अरब जगातील सर्वात उंच हॉटलपैकी एक आहे. मात्र, या हॉटेलबाबत अनेक रहस्यमय गोष्टी सांगण्यात येतात.

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या