बीड / गेवराई
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी निवडून यावेत म्हणून गेवराई तालुक्यातील रानमळा या छोट्याशा गावातील सिध्देश्वर हिंगे यांनी हनुमान जयंतीला भाविकांनी खचाखच भरलेल्या मानाच्या १२ बैलगाड्या ओढून हनुमानजींना नवस केला आहे. त्यांचा उमेदवार बजरंग सोनवणे व माजीमंत्री बदामराव पंडित यांनी गावी जाऊन सत्कार केला.
गेवराई तालुक्यातील रानमळा या छोट्याशा गावातील मराठा आंदोलन मराठा आरक्षणासाठी चळवळीत सहभागी असलेले सिद्धेश्वर हिंगे यांनी मराठा आरक्षणाचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे प्रचंड मताने निवडून यावेत म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी भाविकांनी खचाखच भरलेल्या मानाच्या १२ बैलगाड्या ओढून हनुमानजींना नवस केला आहे. याची माहिती गेवराई तालुक्याचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री बदामराव आबा पंडित यांनी देताच उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बदामराव आबा पंडित, पूजाताई मोरे, पंढरीनाथ लगड, युध्दजित पंडित, महेश बेदरे, अमोल करांडे, आबा दाभाडे, उद्योजक पानसंबळ यांच्यासह रानमळा येथे जावून सिद्धेश्वर हिंगे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.