♻️परळी शहरात मतदार जनजाग्रती करिता सायकल रॅली
परळी : अमोल सुर्यवंशी
रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी बीड लोकसभा अंतर्गत २३३ परळी विधानसभा मतदारसंघांत दिनांक १३ मे २०२४ रोजी होणारे मतदानकरिता मतदार जनजागृतीसाठी नवीन शासकीय विश्रामग्रह परळी वै येथुन सायकल रॅलीस सुरवात करुन रॅली पुढे शिवाजी महाराज चौक , मोंढा मार्केट, टाॅवर , पोलीस स्टेशन , नगर पालीका अशी काढण्यात आली .नगर पालीका कार्यालयात सहभागी सायकल स्वार ,विद्यार्थी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . रॅलीत सहभागी नागरिक व कर्मचारी , विद्यार्थी यांना मार्गदर्शन करुन रॅलीची सांगता करण्यात आली.
🔹याप्रसंगी मा.श्री अरविंद लाटकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परळी , श्री व्यंकटेश मुंडे तहसिलदार परळी , श्री अरविंद कांबळे मुख्याधिकारी नपा परळी ,शिवाजी मुंडे सहा गट वि अ , बाबुराव रुपनर नायब तहसिलदार , श्रीराम कनाके गट शिक्षण अधिकारी तसेच सर्व महसूल विभागाचे तलाठी ,मंडळ अधिकारी व कर्मचारी,पंचायत समिती व शिक्षण विभागाचे कर्मचारी , अनेक डाॅक्टर्स , विविध शाळेचे व अॅकॅडमीचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.या रंलीचे नियोजनतरिता यांनी शिक्षक शयाम आघाव, गोविंद कराड, थोरवे , चौधरी मॅडम , गंगा केरुरकर , विष्णु गीते यांनी परिश्रम घेतले .