5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

ब्रम्हगांव परिसरात राञीच्या वेळी ड्रोन च्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीने वातावरण

ब्रम्हगांव परिसरात राञीच्या वेळी ड्रोन च्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीने वातावरण

 

आष्टी – तालुक्यातील ब्रम्हगाव परिसरात आज दि. 22 ऑगस्ट रोजी राञी 8: 30 वा. दरम्यान ड्रोन ने घिरट्या घातल्याचे नागरिकांनी पाहिले. त्याचा काही लोकांनी मोबाईल कॅमेर्‍यात व्हिडिओ देखील काढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टी शहरापासून पाच – सहा किलोमीटर अंतरावर ब्रम्हगांव आहे. राञी 8:30 वाजण्याच्या सुमारास ब्रम्हगांव परिसरात आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले तसेच संबंधित ड्रोनचा व्हिडिओ देखील काही लोकांनी केले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आष्टी पोलिसांशी संपर्क केला असता या घटनेला दुजोरा मिळाला असुन या बाबत माहिती मिळालेल्या ठिकाणी पोलिस पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या