19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

परळी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

परळी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

25 ऑगस्ट रोजी रोजगार महोत्सवाचे आयोजन

या भव्य रोजगार महोत्सवात हजारो युवक-युवतीनी सहभागी व्हावे- सुनिल गुट्टे

परळी (प्रतिनिधी)

परळी मतदारसंघातील युवक-युवती व बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)च्या ज्येष्ठ नेत्या सौ.सुदामती गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक सुनील रत्नाकर गुट्टे यांनी रविवार दि.25 ऑगस्ट रोजी परळी येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन केले असुन या रोजगार महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सुनिल गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत केले.
रविवार दि.25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते 6 या वेळेत हा रोजगार महोत्सव होणार आहे.यात ५ वी पास ते सर्व पदवीधर,पदव्युत्तर, आय.टी.आय,डिप्लोमा आणि अंतिम वर्ष पदवी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या युवक-युवती व बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे.या महोत्सवात 50 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.या नौकरी महोत्सवात ऑनलाइन नावनोंदणीसाठी स्कॅनर स्कॅन करून नोंदणी किंवा 7822832583 8788345850 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन नोंदणी करावी. हा रोजगार महोत्सव मराठवाड्यातील सर्वात मोठा ठरणार असुन याचा परळी मतदार संघातील युवक-युवती व बेरोजगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुनिल गुट्टे यांनी केले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या