अबब तब्बल २१ व्या वयात २७ लाखांचे पॅकेज
आदित्यची गगनभरारी !
परस्थितिशी लढा, त्याग, एका आईचा संघर्ष या सर्व बाबींचा आदित्यने अगदी कसून सामना करून हे यश संपादन केले आहे.
अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
विशेष वृत्तांकन : नितीन ढाकणे
नाव आदित्य सतिश लहाने.
बीड जिल्ह्यातील एक छोटेसे खेडेगाव म्हणजेच बागझरी, या गावचा तरुण,अत्यंत हुशार ज्याने आपल्या मेहनतीच्या बळावर उत्तुंग असे यश संपादन करताना अनेक अडचणींचा खंबीरपणे सामना करत, करत तो पोहनचला भारतीय प्रद्योगिकी संस्थान इंदोर इथपर्यंत आणि त्याचा हा सर्व प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. (अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क)
आदित्यचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागझरी येथे झाले, त्यानंतर नंतर माध्यमिक शिक्षण केशवराज विद्यालय लातूर येथून झाले. लहानपणापासून अभ्यासाची गोडी असलेल्या आदित्यला इयत्ता दहावी मध्ये ९७.२०% गुण पडले, तेव्हाही त्याच्यावर कौतुकाचा खूप वर्षाव झाला. नंतर अकरावी मध्ये त्याने राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. येथूनच आदित्यला अभियंता बनण्याची प्रेरणा मिळाली. कोरोना सारख्या महामारीच्या काळात कोणतीच ट्युशन क्लास न लावता फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून आदित्यने पहिल्याच प्रयत्नात आयआयटी इंदोर (IIT Indore) या देशातील नामांकित महाविद्यालयामध्ये सन 2021 मध्ये प्रवेश मिळवला. सध्या आदित्यचे पदवीतील तिसरे वर्ष चालू असतानाच पुणे येथील एका मोठ्या नामांकित (BNY ) कंपनी मध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.(अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क)
आदित्यचा आम्हा सर्वांना खूप खूप अभिमान आहे. परस्थितिशी लढा, त्याग, एका आईचा संघर्ष या सर्व बाबींचा आदित्यने अगदी कसून सामना करून हे यश संपादन केले आहे. आदित्यचा आदर्श समोर ठेऊन आणखीन असेच आदित्य घडतील येवढाच विश्वास यानिमित्ताने व्यक्त करावा वाटतो.