20.2 C
New York
Wednesday, August 20, 2025

Buy now

मातोरी गावचे सरपंच यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मातोरी गावचे सरपंच यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

आष्टी प्रतिनिधी : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या मातोरी गावचे सरपंच देविदास शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा चे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या गावचे सरपंच देविदास शिंदे यांनी कडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या अजित दादा पवार यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मातोरीचे सरपंच देविदास शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या