कडा!(प्रतिनिधी) सोपान पगारे
शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता महाविद्यालयाचे सेमिनार हॉलमध्ये येथील भगवान महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाअंर्तगत लेखक व विद्यार्थी वाचन संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ प्रमुख पाहुणे डॉ. ज्ञानेश्वर वैद्य तर लेखक व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अप्पासाहेब टाळके हे होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. लेखक उपप्राचार्य डॉ. टाळके यानीही त्यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान केले. पुस्तक वाचनाचे महत्त्व, ते कसे वाचावे? कोणती पुस्तके वाचावीत ? याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय वाघ यावेळी म्हणाले विद्यार्थ्यांनी मोबाइलपासुन दूर रहावे. मोबाइलपासुन दूर राहिल्यास वाचनाची आवड निश्चित मनात निर्माण होईल. त्यासाठी पालकाची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यांनाही कठोर निर्णय घेऊन मुलांचे लाड कमी करावे लागतील.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री नंदकिशोर धोंडे, श्री काकासाहेब सोले आणि ग्रंथालय सहाय्यक श्री पांडुरंग साबळे यानी परिश्रम घेतले.