13.5 C
New York
Saturday, October 18, 2025

Buy now

मुलींनी सावित्रीमाईंचे विचार आत्मसात करणे काळाची गरज- डॉ.अशोक उढाणे 

  1. मुलींनी सावित्रीमाईंचे विचार आत्मसात करणे काळाची गरज- डॉ.अशोक उढाणे 

 

कडा (प्रतिनिधी):- सोपान पगारे

आष्टी तालुक्यातील उपक्रमशिल जि.प.उच्च प्राथमिक शाळा सांगवी(पा) कें.डोईठाण येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती बालिकादिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ.अशोक उढाणे यांनी बोलताना हे प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
शाळेतील अनेक विद्यार्थीनी सावित्रीमाईंच्या वेशभुषेमध्ये उपस्थित होत्या. सर्वप्रथम प्रतिमापूजन संपन्न झाले. क्षितीजा खिलारे, श्रेयश खंडागळे, तेजश्री कर्डिले या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्याचबरोबर इ. १ली व इ. २री मधील अनुष्का खिलारे, स्वरा भोसले, श्रेया खंडागळे, माहिरा शेख, स्वरा खिलारे, श्वेता भगत, देवश्री भोसले, सृष्टी राऊत, राजविर भोसले, श्लोक जगताप हे विद्यार्थी सावित्रीमाई- ज्योतीबांच्या वेशभुषेत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक चांगदेव तरटे, उपक्रमशिल शिक्षक राहूल मुटकुळे, लताबाई जाधव, वैशाली खकाळ, कुंदा पालवे, वैष्णवी भोसले, अंजली खिलारे, निर्मला इरले यांनी मनोगत व्यक्त करून सावित्रीमाईंच्या विचारांना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आजिनाथ साखरे यांनी केले तर आभार राहुल मुटकूळे यांनी मानले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या