4.9 C
New York
Sunday, January 19, 2025

Buy now

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद – रूपालीताई चाकणकर

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद – रूपालीताई चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

प्रतिनिधी- सोपान पगारे
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत या संघाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे इतर पत्रकार संघानी दखल घेऊन समाजासाठी काम करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांनी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे पुणे येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी दुपारी प्रकाशन प्रसंगी केले.आष्टी तालुका युवा पत्रकार संघ गेल्या १२ वर्षांपासून दिनदर्शिका प्रकाशित करून सर्वसामान्यांना मोफत वितरण करण्यात येत असते सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे पुणे येथील महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांच्या पुणे येथील संपर्क कार्यालयात दि.६ जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले पत्रकार संघाच्या कार्याचे सौ.रुपालीताई चाकणकर यांनी कौतुक केले यावेळी अध्यक्ष अविनाश कदम, संतोष शेठ सानप,पत्रकार अतुल जवणे,प्रेम पवळ,अक्षय विधाते, सचिन तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

आजपर्यंत युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे या मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन…

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे मागिल १२ वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक धार्मिक ‌क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यामध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पशुसंवर्धन, पर्यावरण,वातावरण बदल मंत्री ना.पंकजाताई मुंडे, ना.धनंजयजी मुंडे, ओबीसी विकास, दुग्धविकास,ऊर्जा नुतनीकरण मंत्री अतुलजी सावे,मा.मंत्री आ.सुरेश धस, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मा.मंत्री सदाभाऊ खोत,मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले,मा.आ.बाळासाहेब आजबे,आ.अरुण काका जगताप,मा.आ.भिमराव धोंडे, पनवेलचे आर आर फाऊंडेशनचे अध्यक्ष स्व.राहुल पाटील आदी अधिकारी पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे.

चौकट

महिलांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद– राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर

आष्टीच्या युवा पत्रकार संघाने विविध सामाजिक उपक्रम राबविलेले असून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करुन विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना कौतुकाची थाप देऊन मागिल ४ ते ५ वर्षापासून प्रोत्साहित करत आहे.या पत्रकार संघाचा आदर्श राज्यातील इतर पत्रकार संघाने घ्यावा त्यांच्या हातून असेच विविध सामाजिक उपक्रम घडो सर्वसामान्यांच्या अडचणी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सुटो असे म्हणत युवा पत्रकार संघाच्या कार्याचे अभिनंदन करत रुपालीताई चाकणकर यांनी शुभेच्छा दिल्या…

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या