24.8 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

स्विफ्ट डिझायर कार ची कन्हेरवाडी घाट सुरुवातीस धडक; तीन गंभीर

स्विफ्ट डिझायर कार ची कन्हेरवाडी घाट सुरुवातीस धडक;  तीन गंभीर

परळी /प्रतिनिधी- परळी- अंबाजोगाई महामार्गावर कनेरवाडी गावाच्या पुढे  असणाऱ्या एक पेट्रोल पंपा समोर रस्ता दुभाजकाच्या चालू असणाऱ्या कामावर दुभाजकाला एक स्विफ्ट कार धडकल्याने तीन जण गंभीर जखमी झाले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई कडून परळीच्या दिशेने येणारे शिफ्ट डिझायर ही चार चाकी गाडी क्रमांक एम एच ०४-डीएन-०७८० ही दुभाजकाला धडकली.  यातून प्रवास करणारे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात हालवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली परंतु तत्पूर्वीच जखमीना हलवल्याचे माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या