माहिती अधिकार कार्यकर्ते केतन भोज यांची चौकशीची मागणी
घाटकोपर,(प्रतिनिधी);
मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागात अनागोंदी प्रकार सुरू आहे असा संशय काही सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहे. याआधी ही घाटकोपर पश्चिम विभागातील सर्व प्रभागात स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाअंतर्गत असलेल्या वस्ती स्वच्छता योजना आणि डीप क्लीनिंग योजनेचे सर्वच ठिकाणी तीनतेरा वाजलेले दिसत आहे. अशातचं या घन कचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता हे गेली अनेक वर्षे म्हणजे २०१३ पासून मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागात सहाय्यक अभियंता (घन कचरा व्यवस्थापन ) या पदावर कार्यरत आहे.शासन अधिसूचना दि.२५.५.२००६ नुसार विधिनियम विषयक २००५ मधील प्रकरण दोन,कलम ३(१) अन्वये सेवेतील अधिकारी यांच्याकरिता एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षाचा आहे.मग हे घन कचरा विभागातील काही कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी कसे गेली बारा वर्षे या एकाच ठिकाणी काम कसे काय करत आहे. याला कोणाचे अभय आहे ? विभागातील काही कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी कसे विभागाच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते केतन भोज यांनी यावर आवाज उठवला असून ते याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्याचे नगरविकास मंत्री,मुंबई महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त तथा प्रशासन तसेच राज्याचे मुख्य सचिव,लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त ,नगर विकास विभागाचे प्रधान सचिव,सहाय्यक आयुक्त एन विभाग यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करणार आहेत.आणि या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी करणार आहेत.