27.3 C
New York
Tuesday, April 14, 2026

Buy now

परळी काँग्रेसतर्फे सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी परळी (प्रतिनिधी) – देशाचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी शहर काँग्रेसतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश चौधरी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देश व राज्याच्या प्रगतीत या दोन्ही नेत्यांचे योगदान स्मरण करण्यात आले. बैठकीदरम्यान डॉ. सुरेश चौधरी यांनी परळी शहर काँग्रेससमोर आगामी नगर परिषद निवडणुका ताकदीने लढवण्याचे आवाहन केले. “सुसंस्कृत, स्वाभिमानी, भ्रष्टाचारमुक्त, निर्भय आणि कायद्याचा सन्मान करणारी परळी घडवणे हे आपले ध्येय असावे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी महाविकास आघाडीच्या सोबत एकत्रितपणे निवडणुकीत उतरण्याचेही संकेत दिले. या प्रसंगी डॉ. सुरेश चौधरी, अनिल मुंढे, प्रकाश देशमुख, बहादूर भाई गुलाबराव देवकर, शशी चौधरी, इते श्याम खतीब, वैजनाथ गडेकर, सुहास देशमुख, बद्दर भाई, दीपक शिरसाठ, शेख सद्दाम, रसूल खान, रणजीत देशमुख यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • परळी काँग्रेसतर्फे सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

परळी (प्रतिनिधी) –

देशाचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी शहर काँग्रेसतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश चौधरी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देश व राज्याच्या प्रगतीत या दोन्ही नेत्यांचे योगदान स्मरण करण्यात आले.

बैठकीदरम्यान डॉ. सुरेश चौधरी यांनी परळी शहर काँग्रेससमोर आगामी नगर परिषद निवडणुका ताकदीने लढवण्याचे आवाहन केले. “सुसंस्कृत, स्वाभिमानी, भ्रष्टाचारमुक्त, निर्भय आणि कायद्याचा सन्मान करणारी परळी घडवणे हे आपले ध्येय असावे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी महाविकास आघाडीच्या सोबत एकत्रितपणे निवडणुकीत उतरण्याचेही संकेत दिले.

या प्रसंगी डॉ. सुरेश चौधरी, अनिल मुंढे, प्रकाश देशमुख, बहादूर भाई गुलाबराव देवकर, शशी चौधरी, इते श्याम खतीब, वैजनाथ गडेकर, सुहास देशमुख, बद्दर भाई, दीपक शिरसाठ, शेख सद्दाम, रसूल खान, रणजीत देशमुख यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या