आस्वलांबा येथे श्रीकृष्ण भाऊ ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्पोर्टस् ड्रेस, शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम
परळी ( आस्वलांबा ) —
गावाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, आस्वलांबा येथील सुपुत्र आणि यशस्वी उद्योजक श्रीकृष्णभाऊ पांडुरंग ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त एक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे.
दिनांक १८ जून बुधवार रोजी सकाळी ८ वाजता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आस्वलांबा येथे सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्टस् ड्रेस, शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी गावातील सर्व विद्यार्थी, पालक, तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शालेय वयातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान, स्वच्छता, खेळाची आवड आणि शिक्षणाबद्दल उत्सुकता वाढवणारा हा उपक्रम गावात आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे.
गावाच्या प्रगतीत शिक्षणाचा वाटा किती महत्त्वाचा आहे, हे जाणून श्रीकृष्णभाऊ ढाकणे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, हे विशेष कौतुकास्पद आहे.
गावाच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा आणि सामाजिक बांधिलकीची आठवण करून देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.