21.2 C
New York
Friday, April 17, 2026

Buy now

घरकुलाचा हफ्ता मिळावा करिता माकपचे धरणे

➡️ घरकुलाचा हफ्ता मिळावा करिता माकपचे धरणे

⬛ पंचायत समितीकडून 8 दिवसात योग्य कार्यवाहीचे लेखी आश्वासन

परळी / प्रतिनिधी

घरकूलाचा प्रथम हफ्ता देय करून बोगस लाभार्थ्यांना वगळण्यात त्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मोहा शाखेच्या वतीने परळी पंचायत समिती समोर सोमवार दि 16 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले दरम्यान गट विकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्याशी चर्चा करून काही दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

परळी तालुक्यातील मोहा या गावातील मोदी आवास योजनेतील घरकुलाचा पहिला हप्ता मिळावा या करिता गावचे रहिवासी मागच्या एक वर्षापासून सातत्याने मोदी आवास याजेने अंतर्गत घरकुलाचा पहिला हप्ता मिळण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहे मात्र प्रत्येक वेळी कार्यालयाकडून तोंडी आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. माकप मोहा शाखेने 15 जून 25 पर्यंत पहिला हप्ता मिळावा यासाठी दिलेल्या निवेदनाची प्रतीक्षा संपल्याने सोमवार दि 16 जुन पासून परळी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलन प्रसंगी
मोहा ग्राम पंचायत ओबीसी कोट्यातील घरकुले पात्र लाभार्थ्याला डावलून बोगस लाभार्थ्याची नावे दिले, त्याची चौकशी करून या दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी व योग्य लाभार्थ्याना लाभ देण्यात यावा अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली.दरम्यान समितीचे गट विकास अधिकारी एस
एन.केंद्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्याशी फोनवर चर्चा करून 35 लाभार्थीना येत्या 8 ते 10 दिवसात वरिष्ठांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने हे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.या बेमुदत धरणे आंदोलनात माकपचे जिल्हा सचिव कॉ अजय बुरांडे, कॉ सुदाम शिंदे, कॉ पप्पु देशमुख, कॉ मनोज देशमुख, कॉ विशाल देशमुख, कॉ मदन वाघमारे, वैजनाथ पाळवदे, विश्वांभर वाघमारे, शरद कुमार महाजन, नामदेव पांचाळ, विष्णु देशमुख, राम वानरे, मोहन शिंदे, धर्मराज कोकाटे, सुरेश कोकाटे, सचिन महाजन, लक्ष्मण कोकाटे, गोविंद पांचाळ, राजाभाऊ महाजन, सोपान पांचाळ, अशोक राजमाने, शिवाजी पांचाळ आदीसह अनेक गावकरी उपस्थित आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या