6.4 C
New York
Wednesday, November 19, 2025

Buy now

भाजप नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठा व महत्वाचा पक्ष राहणार – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

भाजप नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठा व महत्वाचा पक्ष राहणार – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

लोहा / प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्ष हा नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठा व महत्वाचा पक्ष राहणार असून, भाजपाला साथ द्या, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.

दि. २४ ऑक्टोबर रोजी लोहा येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यानिमित्त तसेच भाजपाचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा महानगराध्यक्ष व माजी आमदार अमर राजूरकर, माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार, लोहा उत्तर मंडळ अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, केरबा बिडवई, माजी जि.प. सदस्य विजय धोंडगे, डॉ. सुनिल धोंडगे, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नबीसाब शेख, पुंडलीकराव पाटील बोरगावकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले, “लोहा-कंधारमध्ये यापूर्वी एवढी एकजूट कधीच नव्हती, ती आज दिसत आहे. व्यासपीठावरील मंडळी एकदिलाने काम करत आहेत. माझ्या डावीकडे गजानन सूर्यवंशी आणि उजवीकडे शरद पवार आहेत — दोघांना जोडणारे मधील ‘फेविकॉल’ म्हणजे आपली एकता आहे.”

ते पुढे म्हणाले, “गजानन सूर्यवंशी हे लोह्याचे मालक असून शरद पवार हे चाणाक्ष रणनीतीकार आहेत. केरबा सावकार यांसारखे कार्यकर्ते पक्षाचे खरे बळ आहेत. विरोधकांनी नकारात्मक राजकारण सोडून विकासाकडे लक्ष द्यावे. दलित, मुस्लिम आणि ओबीसी बांधवांनीही योग्य विचार करून संस्था भलत्याच्या हाती जाऊ देऊ नयेत.”

चव्हाण यांनी सांगितले की, “ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या विचारांची निवडणूक असेल. शिव्या देऊन मते घेणाऱ्यांचा मी नाही, सकारात्मक काम करणारा आहे. जनतेचा विकास हा आमचा ध्यास आहे.”

या कार्यक्रमात माजी आमदार अमर राजूरकर म्हणाले, “नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका भाजप सर्व शक्तीनिशी लढवणार आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पक्ष सर्वेक्षणानंतर ठरवेल, त्यामागे सर्वांनी एकजुटीने उभे राहावे. खा. अशोकराव चव्हाण साहेबांचा वाढदिवस २८ ऑक्टोबरला आहे — तेव्हा लोहा नगरपरिषदेत सत्ता आणून साहेबांना गिफ्ट द्यावे.”

कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाषण मा. नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले. ते म्हणाले, “लोहा शहराचा विकास साधण्यासाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य केले. मुख्यमंत्री भाजपाचे आहेत, तसेच खा. अशोकराव चव्हाण यांची आपल्याला भक्कम साथ आहे. येणाऱ्या निवडणुकीत लोहा नगरपरिषदेत भाजपाचा झेंडा फडकवू, असा माझा विश्वास आहे.”

https://atulyamaharashtra.com/
Previous article
Next article
परळी काँग्रेसतर्फे सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी परळी (प्रतिनिधी) – देशाचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी शहर काँग्रेसतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश चौधरी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देश व राज्याच्या प्रगतीत या दोन्ही नेत्यांचे योगदान स्मरण करण्यात आले. बैठकीदरम्यान डॉ. सुरेश चौधरी यांनी परळी शहर काँग्रेससमोर आगामी नगर परिषद निवडणुका ताकदीने लढवण्याचे आवाहन केले. “सुसंस्कृत, स्वाभिमानी, भ्रष्टाचारमुक्त, निर्भय आणि कायद्याचा सन्मान करणारी परळी घडवणे हे आपले ध्येय असावे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी महाविकास आघाडीच्या सोबत एकत्रितपणे निवडणुकीत उतरण्याचेही संकेत दिले. या प्रसंगी डॉ. सुरेश चौधरी, अनिल मुंढे, प्रकाश देशमुख, बहादूर भाई गुलाबराव देवकर, शशी चौधरी, इते श्याम खतीब, वैजनाथ गडेकर, सुहास देशमुख, बद्दर भाई, दीपक शिरसाठ, शेख सद्दाम, रसूल खान, रणजीत देशमुख यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या