19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

महिला महाविद्यालयात करिअर कट्टा उद्‌घाटन संपन्न

       महिला महाविद्यालयात करिअर कट्टा उद्‌घाटन संपन्न

परळी प्रतीनिधी : अमोल सुर्यवंशी :  दि. २६ / ०७ / २०२२ परळी येथील कै . लक्ष्मीबाई देशमुख   महिला महाविद्यालयांत नवीन शैक्षणिक धोरण प्रबोधन सत्र संपन्न झाले .

या कार्यक्रमासाठी  अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे  तर  प्रमुख उपस्थिती संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख हे होते –

महाविद्यालयाच्या   प्राचार्या –  डॉ. विद्याताई देशपांडे  यांनी त्यांच्या भाषणात नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली. त्यांनी देशात आजवर झालेल्या शैक्षणिक धोरणांचा संपूर्ण आढावा घेतला . नवीन धोरणात भारतीय संस्कृतीचे प्राधान्य , त्याची तत्त्वे ,या धोरणाचे गुणदोष व फायदे तोटे यांचाचाही आढावा प्राचार्यांनी घेतला.

यानंतर महाविद्यालयाच्या कु . शुभांगी उजगरे , कु.अंकिता मुंदडा कु. सायली चाटोरीकर . कु. पल्लवी पानखडे  कु. ममता जांगिड या मुलींनी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर बनविलेल्या विविध भित्तिपत्रकांचे विमोचन  मान्यवरांच्या शुभहस्ते झाले .

त्यानंतर प्रमुख वक्ते लाभलेले प्रा . डॉ. कोकाट सर यांनी त्यांच्या वक्तव्यात नवीन शै .धोरण काय आहे ? त्याला कसे सामोरे जावे याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले . २०२० मध्ये मंजूर झालेले हे तिसरे शैक्षणिक धोरण असून त्यांत झालेले विविध बदल सांगून त्याची उद्दिष्टे यांची माहिती दिली . या नूतन धोरणात – भारतीय प्राचीन विद्येचा , विद्यादान पद्‌धतीचा अंतर्भाव केला आहे . ५ + ३ + ३ + ४ अशा विभागणी  असलेल्या या धोरणात विद्यार्थी हा त्याची पहिली ५ शैक्षाणिक वर्षे  मातृभाषेतच शिक्षण घेणार आहे . हे सांगून त्यांनी उच्च शिक्षणपदवी ही ३ किंवा ४ वर्षाची असून  विषयाच्या  ऐच्छिकतेवर , त्याच्या कौशल्याधारित पद्धतीवर सरांनी सखोल मार्गदर्शन केले .

या नंतर संस्थेचे कोषाध्यक्ष मा .प्रा. प्रसादजी देशमुख यांनी त्यांच्या वक्तव्यात विद्यार्थ्याला संकल्पनात्मक ज्ञान मिळावं हे या धोरणाचे साध्य आहे असे सांगितले . विद्यार्थी हा नैतिकता सांभाळणारा व देशाचा जबाबदार नागरिक घडावा हे या धोरणाचे साध्य आहे असे प्रतिपादन केले.

विद्यार्थांना अत्यंत उपयुक्त माहिती देणार्‍या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ . यल्लावाड सरांनी केले तर प्रा . डॉ. चव्हाण सरांनी आभार मानले . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी उपस्थित होत्या .

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या