सरकारला आपण धक्का लावू शकतो ! जयंत पाटी
मुंबई वृत्तसंस्था :
दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचप्रमाणे राज्यात देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केले जात आहे. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं सरकार पुन्हा आणण्याकरिता शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यानंतरच शेतकऱ्यांच्या समस्या सोडणार आणि न्याय देणारं सरकार येईल,अस जयंत पाटील म्हणाले
आजही महाराष्ट्रातील काही भागात पाऊस आहे तर काही भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट देखील आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना कुठलीही मदत देण्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. एकेकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्या होत असताना शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना पंतप्रधान यांना यवतमाळमध्ये घेऊन आले होते. यावेळी त्या शेतकऱ्यांना 6 हजार कोटी रुपयांचे केंद्राकडून पॅकेज मंजूर करून देण्याचे काम पवारांनी केले होते. शेतकऱ्यांचे समस्या सोडवण्यासाठी शरद पवार यांनी शेतकऱ्यांकरिता विविध योजना आत्महत्याग्रस्त भागात राबवल्या होत्या, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.