सिरसाळयात कृषी दुकादारांकडून शेतकऱ्यांची अडवणूक युरिया खत पाहिजे तर घ्यावा लागतो दुय्यम खत दुकानदारांची शेतकऱ्यावर बळजबरी, कृषी मंत्री साहेब कार्यवाही करणार का?
सिरसाळा/प्रतिनिधी
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करत कृषी दुकादारांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी या साठी थेट कृषी दुकानदारावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. तरी सुद्धा कृषी मंत्री यांच्या परळी मतदार संघातील सिरसाळा गावात काही कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट बरोबर पिळवणूक सुद्धा होत असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील काही कृषी दुकानदार हे शासनाकडून युरीया खताचा पुरवठा उपलब्ध असताना सुद्धा मागणी प्रमाणे खत देत नसून शासनाच्या दर प्रमाणे युरीया खत 266 रूपये 50 पैसे असताना 500 ते सहा शे रुपयात विकले जात आहे व तेही युरीया खत पाहिजे असेल तर दुसरे खत सोबत घ्यावे लागेल असे जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची मोठ्यप्रमाणावर पिळवणूक कृषी दुकानदारांकडून होताना दिसत आहे हे फक्त खतापूर्तेच नसून दुसरे कोणतेही तन नाशक औषधे घ्यायचे असेल तर त्या सोबत दुसरे औषधे घ्यावेच लागेल अश्या प्रकारे नियम लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस तात्काळ कार्यवाही केल्या परंतु त्यांच्याच परळी मतदार संघातील सिरसाळा गावात खुल्या आम पणे शेतकऱ्यांची आर्थिक लूट करुन पिळवणूक केली जात आहे. ह्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देवून तात्काळ ह्या दुकानदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.