22 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

चऱ्हाटा रोडवरील खून प्रकरणातील आरोपी 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

चऱ्हाटा रोडवरील खून प्रकरणातील आरोपी 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

बीड : प्रतिनिधी

दिनांक 01/08/2023 रोजी 06.00वा. चे सुमारास मा. पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना माहिती मिळाली कि चऱ्हाटा रोडलगत रेल्वे पुला जवळ खडडयामध्ये अज्ञात इसमाचे प्रेत पडलेले आहे व त्याचे डोक्याला, तोडांवर गंभीर जखमा झाल्या आहेत व जवळच बजाज अवेंन्जर मोटार सायकल पासिंग क्र एम एच 23 ए. एम. 7094 पडलेली आहे त्यावरुन स्थागुशाचे पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता सदरचा प्रकार खुनाचा असल्याने तपासास सुरुवात केली असता प्रथम प्रेताचे बाजुला पडलेल्या मोटार सायकलचे पासिंग वरुन मोटार सायकल व सदरचे प्रेत हे पाडुरंग नारायण माने रा. आनंदवाडी ता. जि. बीड याची असल्याचे निष्पन्न झाल्याने आजुबाजुला चौकशी केली असता माहिती मिळाली कि दिनांक 31/07/2023 रोजी यातील मयत नामे पांडुरंग नारायण माने व त्याचे दोस्त विकास शंकर वायकुळे व ओमकार विष्णु लकडे हे तुळजाई हॉटेल च-हाटा रोड येथे दारु पित बसले होते व त्यांचे मध्ये किरकोळ वाद झ
गला होता व ते तीघे जण मोटार सायकल वर रेल्वे पुला कडे गेले होते अशी माहिती मिळाली. सदरची बाब गंभीरतेने घेवून मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी वरील घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद
करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. अपर पोलीस अधीक्षक, बीड व पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथक तयार करुन संशईत आरोपी विकास शंकर वायकुळे व ओमकार विष्णु लकडे यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या. मा. पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत व तात्रिक विश्लेषणाद्वोर माहिती मिळाली की, 1) विकास शंकर वायकुळे व ओमकार विष्णु लकडे सुपा जि. अहमदनगर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेऊना त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1 ) विकास शंकर वायकुळे वय 23 वर्ष रा.बार्शी नाका बीड ता. जि. बीड. 2 ) ओमकार विष्णु लकडे वय 22 वर्ष ढगे कॉलनी बार्शी नाका बीड ह.मु. आनंदवाडी शिवार बीड असे सांगीतले त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे .हे फिर्यादी नामे नितीन नारायण माने वय 32 वर्ष व्यवसाय हॉटेल चालक रा. आनंदवाडी शिवार ता. जि. बीड यांचे फिर्यादी वरुन पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गु.र.नं. 232/2023 कलम 302,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर
आरोपी सदर यांना पोलीस ठाणे बीड ग्रामीण यांचे ताब्यात देऊन पुढील तपास पो.स्टे. बीड ग्रामीण क
सदरची कामगिरी ही मा. श्री नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक, बीड, मा. श्री सचिन पांडकर अपर पोलीस
अधीक्षक, बीड, मा. श्री. संतोष साबळे पोलीस निरिक्षक स्थागुशा, बीड, पो.उप.नि. श्रीराम खटावकर, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना-विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोना- गणेश हांगे, पोशि – सचिन आंधळे, विकी सुरवसे, अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या