🔺राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त पत्रकार भवन येथे व्याख्यानाचे आयोजन
🔷परळी /प्रतिनिधी
राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांचे सामाजिक शैक्षणिक आणि आजचे वास्तव या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ज्येष्ठ संपादक, साहित्यिक रानबा गायकवाड, इंजि. भगवान साकसमुद्रे, संपादक बालासाहेब फड, सम्राट गित्ते आदींनी केले आहे.
राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे सेवानिवृत्त शिक्षक तथा लेखक ए.तू.कराड सर यांचे राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांचे सामाजिक शैक्षणिक विचार आणि आजचे वास्तव या विषयावर व्याख्यानाचे आयोजन 29 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक अतुल्य महाराष्ट्राचे मुख्य संपादक नितीन ढाकणे यांचे उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक तथा लेखक ए. तु. कराड, दै.परळी प्रहारचे मुख्य संपादक राजेश साबणे, दै. पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी धनंजय आरबुने, साप्ताहिक समाचारचे मुख्य संपादक आत्मलिंग शेटे, दै. गांवकरी चे बीड जिल्हा प्रतिनिधी जगदीश शिंदे, परळी बातमीदारचे संपादक महादेव गित्ते, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक तथा संपादक रानबा गायकवाड, इंजि. भगवान साकसमुद्रे, दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, सम्राट गित्ते आदींनी केले आहे.