-5.5 C
New York
Friday, January 16, 2026

Buy now

बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीचा परळी बंद माघार-बहादुरभाई

बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीचा परळी बंद माघार-बहादुरभाई

काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून होणार निषेध

परळी : प्रतिनिधी

बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्र बंदच्या समर्थनात परळी बंदची हाक देण्यात आली होती.राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही,असा निर्णय दिला असल्याने उच्च न्यायालयाचा सन्मान करत आजचा परळी बंदचा निर्णय परळी महाविकास आघाडीने माघे घेतला आहे.असे परळी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात विविध ठिकाणी काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे असे परळी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी पत्रकात नमुद केले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या