15.4 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर — 31 जानेवारीपूर्वी पार पडणार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर — 31 जानेवारीपूर्वी पार पडणार

मुंबई :
राज्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर, आज (4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत औपचारिक घोषणा केली.

राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अशा सर्व संस्थांसाठी या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणुकांचा अचूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका आता मार्गी लागल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींकडून मोर्चेबांधणी, जनसंपर्क मोहीम आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तयारीचे आदेश दिले असून, प्रभाग रचना, मतदार याद्या आणि आरक्षण प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
आता राज्यातील नागरिकांच्या नजरा निवडणुकांच्या तारखा आणि संभाव्य राजकीय समीकरणांवर खिळल्या आहेत.

https://atulyamaharashtra.com/
Previous article
परळी काँग्रेसतर्फे सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी परळी (प्रतिनिधी) – देशाचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी शहर काँग्रेसतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश चौधरी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देश व राज्याच्या प्रगतीत या दोन्ही नेत्यांचे योगदान स्मरण करण्यात आले. बैठकीदरम्यान डॉ. सुरेश चौधरी यांनी परळी शहर काँग्रेससमोर आगामी नगर परिषद निवडणुका ताकदीने लढवण्याचे आवाहन केले. “सुसंस्कृत, स्वाभिमानी, भ्रष्टाचारमुक्त, निर्भय आणि कायद्याचा सन्मान करणारी परळी घडवणे हे आपले ध्येय असावे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी महाविकास आघाडीच्या सोबत एकत्रितपणे निवडणुकीत उतरण्याचेही संकेत दिले. या प्रसंगी डॉ. सुरेश चौधरी, अनिल मुंढे, प्रकाश देशमुख, बहादूर भाई गुलाबराव देवकर, शशी चौधरी, इते श्याम खतीब, वैजनाथ गडेकर, सुहास देशमुख, बद्दर भाई, दीपक शिरसाठ, शेख सद्दाम, रसूल खान, रणजीत देशमुख यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या