डॉक्टर बी. धीरज कुमार यांचा नियोजनबद्ध छापा
आज रोजी दि 30/01/2024 रोजी बी धीरज कुमार,सहायक पोलीस अधीक्षक माजलगाव.यांना माहिती मिळाली होती की,बीड शहरातील अंबिका नगर चौकामध्ये येथे कुंटणखाना चालू आहे. यावरून त्यांचेकडून एक विशेष पथक तयार करण्यात आलं आणि या विशेष पथकामार्फत सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शाहूनगर अंबिका चौक येथे छापा मारला असता महिला नामे सोजरबाइ होन्नाजि खंडागळे हिचे घरामध्ये अतिशय योजनाबद्धरीत्या कुंटणखाना चालू असलेला आढळून आला.
यासाठी एक बनावट ग्राहक तयार करण्यात आलं होतं आणि बनावट बनावट ग्राहकाकडून यातील सोजरबाइ होन्नाजि खंडागळे हिने कुंटणखाना चालवण्यासाठी पैसे स्वीकारताच यातील पोलीस पथकाने छापा मारला आणि आंटी सह दोन ग्राहकांना रंगेहात सर्वांना पकडलं. सदरील छापा मारून एकूण आठ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.आठ पैकी चार महिला या पश्चिम बंगाल राज्यातील असून एक महिला झारखंडची आहे तसेच एक महिला बीड तसेच एक महिला ठाणे एक महिला मुंबई येथून आणण्यात आल्या होत्या. यातील सोजरबाइ होन्नाजि खंडागळे हिला अटक करण्यात आलेली आहे आणि या पाठीमागे इतरही आरोपी असल्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. सदर ठिकाणाहून रोख रक्कम 25,600 रुपये सह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पिडितांची त्यांची सुटका केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे.
सदरील कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर सर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर सर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर बी. धीरज कुमार सर यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या पार पाडली. सदर पोलीस पथकामध्ये शीतलकुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक, बीड शहर, के.बी.माकणे , पोलीस उपनिरीक्षक, माजलगाव शहर, माजलगाव उपविभागीय कार्यालयाचे आतिश कुमार देशमुख अशोक नामदास,ढगे मॅडम,सताराम थापडे ,तुकाराम कानतोडे,गणेश नवले यांचा तर बीड शहर चे अशपाक वाईकर यांचा सहभाग होता.
बीड शहर चे सय्यद अशपाक . जयसिंग वायकर. मनोज परंजाने यांचा सहभाग होता.