*कै.कल्पना तानाजीराव दहातोंडे यांचे निधन*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील नांदुरवेस गल्ली येथील कल्पना तानाजीराव दहातोंडे (68) यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. उद्या शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
शहरातील नांदुरवेस गल्ली येथील उमेश तानाजीराव दहातोंडे, दिनेश तानाजीराव दहातोंडे व शैलेश तानाजीराव दहातोंडे यांच्या मातोश्री कल्पना तानाजीराव दहातोंडे यांचे अल्पशा आजाराने 68 व्या वर्षी शुक्रवार,दि. 16.02.2024 रोजी दुपारी 02.00 वाजता प्राणज्योत मालवली.
कै. कल्पना तानाजीराव दहातोंडे या धार्मिक, सामाजिक तसेच प्रत्येकाशी मायेने वागणाऱ्या होत्या. त्यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै. कल्पना तानाजीराव दहातोंडे यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. 17.02.2024 रोजी सकाळी 09.00 वाजता परळी वैजनाथ येथील सार्वजनिक स्मशान भुमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
दहातोंडे परिवारावर कोसळलेल्या दु:खात …………………………….परिवार सहभागी आहे.