दिल्लीच्या किसान मोर्चेच्या समर्थनात डाव्या आघाडीचे केज मध्ये निदर्शने
तहसिलदार मार्फत पंतप्रधानाना निवेदन आंदोलनाची दखल घ्या – भाई मोहन गुंड
केज (प्रतिनिधी)
देशात दिवसेंदिवस शेतकरी कामगारांचे होत असलेले हाल थांबवणे गरजेचे आहे शेतकरी देशी धुळीला लागत आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहे, भरत सरकारने तीन कृर्षी कायदे पारीत करुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावला होता म्हणुन तीन कृषी कायद्याच्या विरोधात देशातील किसान मोर्चाच्या वतीने मोठे आंदोलन झाले होते. भारत सरकारने केलेला शब्द पाळला नाही म्हणून, भारत सरकार विरोधात गेली आठ दिवसापासून दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, या आदोलनाला केज तालुक्यातील शेकाप भाकप माकप या डाव्या पक्षांचा पाठिंबा आसुन सदरील आंदोलनातील प्रश्नाचा तात्काळ विचार करून प्रश्न मार्गी लावावेत अन्यथा दिल्लीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ केज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यात येईल आशा इशारा भाई मोहन गुंड यांनी तहसिलदार यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. निवेदनात डॉ.एस.एम. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. केंद्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे 100% उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा देण्याचा कायदा करा. शेतीमालावरील निर्यात बंदी तात्काळ उठवा.
देशातील होत असलेले खाजगीकरण तात्काळ थांबवण्यात यावे.
सरकारी निमसरकारी शिक्षणसंस्था. महामंडळे आणि शासनाच्या विविध उपक्रमातील रिक्त पदाची भरती तात्काळ करा.
सन 2022 मधील केज तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ वाटप करा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या पार्टीप्रमाणे तीन हजार रुपये ऊसाला प्रति टन भाव द्या.कृष्णा खोऱ्याचे पाणी मांजरा धरणात तात्काळ सोडा. ऊस तोडणी वाहतूक कामगार कराराची मुदत संपल्यामुळे नवीन दराचा करार तात्काळ करा या मागणीसाठी साठी आज केंद्र सरकारचा डाव्या आघाडीच्या वतीने निषेध केला यावेळी भाई मोहन गुंड, कल्याण चाटे, शिवाजी ठोंबरे, अशोक रोडे , हामीद शेख ,रामलिंग पाटील ,मंगेश देशमुख, आकाश घुले , हनुमंत कांबळे,रामलिंग पिसुरे श्रीराम डबरे इत्यादी उपस्थित होते.