20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

गोपीनाथ गड ते यशःश्री ; पंकजाताई मुंडेंचं जन्मभूमीत अभूतपूर्व स्वागत

गोपीनाथ गड ते यशःश्री ; पंकजाताई मुंडेंचं जन्मभूमीत अभूतपूर्व स्वागत

🔶गोपीनाथ गडावर लोकनेत्याच्या चरणी नतमस्तक*

🔶पांगरी, परळीत स्वागताचा जल्लोष ; ठिकठिकाणी महिलांनी केलं औक्षण; कार्यकर्त्यांत उत्साह संचारला*

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे यांचं आज जन्मभूमीत जल्लोषपूर्ण आणि अभूतपूर्व असं स्वागत झालं. स्वागतापूर्वी त्यांनी गोपीनाथ गडावर आपले पिता आणि नेता लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पांगरी व परळीत कार्यकर्त्यांनी वाजतगाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं जोरदार स्वागत केलं.

बीडहून दुपारी पंकजाताई मुंडे हया थेट गोपीनाथ गडावर आल्या. याठिकाणी त्यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. दर्शनानंतर पांगरी येथील चौकात त्यांचं ढोल ताशांच्या निनादात वाजतगाजत, जेसीबीतून फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आलं. स्वागतासाठी बाहेरून खास बॅन्ड पथक मागविण्यात आले होते.

🔶शहरात ठिक ठिकाणी औक्षण ; स्वागताचा जल्लोष

पंकजाताई मुंडे यांचं शहरात आगमन होताच इटके काॅर्नर, उड्डाणपूल, एकमिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व स्तरातील नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ठिक ठिकाणी महिलांनी त्यांचं औक्षण केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या स्वागतासाठी. शहरात लावण्यात आलेल्या भव्य कट आऊट्स, बॅनर, कमानींनी लक्ष वेधून घेतले होते.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या