*दादाहरी वडगाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रुपेश मुंडे तर सचिव पदी गौतम मुंडे यांची निवड*
परळी, (प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त मौजे दादाहरी वडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी रुपेश मुंडे तर सचिव पदी गौतम मुंडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त संविधान नगर दादाहरी वडगाव जयंती कमिटी जाहीर करण्यात आली. यात सर्वानुमते अध्यक्षपदी रुपेश लक्ष्मण मुंडे, उपाध्यक्षपदी शंकर दिगंबर पैठणे, कोषाध्यक्षपदी संघपाल जनार्दन मुंडे ,सचिव गौतम राजेभाऊ मुंडे, सहसचिव दर्शन हनुमान मुंडे, सल्लागार प्रदीप गंगाधर साळवे, धनंजय मारुती ताटे, दिलीप भीमराव मुंडे आदींची निवड करण्यात आली.
बैठकीला उपसरपंच प्रकाश मुंडे, रमेश मुंडे, ग्रामपंचायत सदस्य अंतराम सावंत, जनार्दन मुंडे, बाळासाहेब मुंडे, राम मुंडे, राजेभाऊ मुंडे, सुभाष मुंडे, परमेश्वर मुंडे, दिलीप मुंडे, सुखदेव मुंडे, वशिष्ठ मुंडे, बाळू मुंडे, अविनाश मुंडे, भास्कर मुंडे, कपिल मुंडे व समस्त सविधान नगर येथील भीमसैनिक वडगाव दादाहरी आदींची उपस्थिती होती.