20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

बीड लोकसभा निवडणूक करिता परळी येथे मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

बीड लोकसभा निवडणूक करिता परळी येथे मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

परळी / प्रतिनिधी

बीड लोकसभा मतदार संघअंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघातील ३४२ मतदान केंद्राकरिता नियुक्त झालेले व मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना संपुर्ण मतदान प्रक्रिया याबाबतचे प्रशिक्षण हालगे गार्डन परळी वै येथे तर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत वर्गनिहाय प्रशिक्षण वैद्यनाथ महाविदयालय परळी या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न झाले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, व्यंकटेश मुंडे तहसिलदार परळी वै, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर , अण्णा वंजारे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी , मास्टर ट्रेनर तसेत मंडळ अधिकारी व महसूल विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बीड लोकसभा मतदार संघ निवडणुक पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 04.05.2024 रोजी सर्व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले.अधिकारी व कर्मचारी यांची संख्या लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा विस्कळीतपणा न येता सुलभ पद्धतीने प्रशिक्षण संपन्न व्हावे यासाठी प्रशिक्षण सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात दोन ठिकाणी संपन्न झाले.सकाळच्या सत्रात व दुपार सत्रात
१५१६ कर्मचारी यांना हे प्रशिक्षण स्वतंत्रपणे देण्यात आले.
या प्रशिक्षणाची सुरुवात ही राष्ट्रगीताने करण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांचा या प्रशिक्षणास उद्बोधन करणारा शुभेच्छा व मार्गदर्शन करणारा संदेश प्रथम दाखवण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी नियुक्त मतदान अधिकारी यांना ईव्हीम व साहित्य व विविध अहवाल याबाबतीत सविस्तर माहिती देऊन निवडणूकीचे कामकाज करताना होणाऱ्या चुका टाळण्याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनीच वाचन व पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले .
यावेळी व्यंकटेश मुंडे तहसिलदार यांनी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना परळी विधावसभा मतदारसंघात होणारे मतदान साहित्य वितरण केंद्र व स्विकृती केंद्र व त्याचे नियोजन , मतदानाचे आदल्या दिवशी व मतदान दिवशी करावयाची महत्वाची कामे , ईव्हीम माॅक पोल, सिलींग , विविध घोषणापत्र , लिफाफे ईत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक नायब तहसिलदार मिलींद गायकवाड व बालाजी कचरे अवल कारकुन यांचे नियोजनाखाली सर्व झोनल अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी वैद्यनाथ महाविदयालय येथे खोलीनिहाय करण्यात आले . मतदान प्रक्रिया ही निष्पक्ष, पारदर्शक व खुल्या वातावरणात पार पाडण्यात सहाय करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडावे असे आवाहन केले.

प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट मशीन याचे प्रात्यक्षिक पाहून मतदान यंत्रे स्वतः हाताळनी करून पहिली.या प्रशिक्षणाच्या प्रस्ताविकातून नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी निकोप आणि आंनददायी वातावरणात राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन गोपनीयता भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे सांगितले. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी श्री सूरज शिंदे, श्री धनराज भाडेकर महसूल सहाय्यक, श्री पंकज दहातोंडे व मुसळे लिपिक नगर परिषद परळी, हरिशचंद्र चाटे व ईतर शिक्षक वसीम शेख , श्री अनिल गवळी, श्री दिगंबर शिनगारे महसूल सहाय्यक तसेच सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , कोतवाल व शिपाई तहसील कार्यालय परळी यांनी परिश्रम घेतले…

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या