5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

निवडणुक यंत्रणा सज्ज पण ! माजलगाव विधानसभा मतदार संघातील तालुका निहाय मतदार संख्येची माहितीच नाहि ?

निवडणुक यंत्रणा सज्ज पण !

माजलगाव विधानसभा मतदार संघातील तालुका निहाय मतदार संख्येची माहितीच नाहि ?

माजलगाव : प्रतिनिधी

बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माजलगाव विधानसभा मतदार संघात सहाय्यक निवडणुक अधिकाऱ्या सह अतिरिक्त सहाय्यक निवडणुक अधिकारी तीन यांच्या नियंत्रणा खाली ३९+७क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे पण बीड लोकसभा मतदार संघात येणाऱ्या माजलगाव विधानसभा मतदार संघातील तालुका निहाय मतदान संख्येची आकडेवारीच काढलेली नाही असे निवडणुक विभागात वर्षांनुवर्षे काम करणारे तथा जि.प.शाळेचे शिक्षक असलेले एम.व्हि.चव्हाण यांनी सांगितले आहे. यावरुन माजलगाव विधानसभा मतदार संघातील निवडणुक विभाग किती तत्परतेने निवडणुक प्रक्रिया‌ हाताळत आहे हे लक्षात येते. असो आज होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत माजलगाव विधानसभा मतदार संघातील ३७८+१मतदान केंद्रातुन ३लाख, ३८हजार,६३१मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १लाख,७९हजार,६७०पुरुष,१लाख,५८हजार,९६०महिला यात एकुण अंपग मतदार १२०५पैकी ७९३पुरुष,४१२मतदारांचा समावेश आहे.
यासाठी माजलगाव विधानसभा मतदार संघातील तालुका निहाय मतदान केंद्रांची संख्या पुढिल प्रमाणे-माजलगाव-१७७,धारुर-१२१,वडवणी-८१.
मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मतदान यंत्रे सीयू-५३६,बीयू-१३९०,व्हिव्हिपैट ५७७ वाहने एसटी बसेस -४७,मिनी बस -०९,एस्ट्राजीप -१३,क्षेत्रिय अधिकारी वाहने-३९,मास्टर ट्रेनर वाहने -०६अशी वाहने तैनात करण्यात आले आहेत. केंद्राध्यक्ष ४२०सह एकुण १२७६मतदान अधिकारी पैकी २८९महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.अशा माहितीचे प्रसिद्ध पत्रक निवडणुक विभागाकडून माजलगाव येथील पत्रकार ग्रुप मध्ये चव्हाण यांनी पाठवले होते.तर यासाठी किती पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे याचा मात्र कसलाच उल्लेख करण्यात आला नाही.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या