17.4 C
New York
Saturday, June 8, 2024

Buy now

spot_img

खाडे स्वतःहून एसीबी समोर हजर

खाडे स्वतःहून एसीबी समोर हजर

बीड :

 

एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात फरार असलेला आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे अखेर सापडला आहे. खाडेच्या शोधात पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. गुरुवारी रात्री उशिरा खाडे हा स्वतःहून एसीबी समोर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडे एक कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप खाडेवर होता. त्यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आला. या प्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकासह सहायक फौजदार आणि खासगी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या गुरुवारी रात्री घराची झडती घेतली असता खाडेच्या बीड मधील भाड्याच्या घरात एक कोटी आठ लाख रुपयांची रोख, १० तोळे सोने, साडे पाच किलो चांदी आणि सहा ठिकाणच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे सापडली होती. पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि सहायक फौजदार आर. बी. जाधवर या दोघांना निलंबित करण्यात आले होते. हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते.
बीडमधील जिजाऊ मल्टिस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडेने एक कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते. ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रुपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते.
त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या