27.5 C
New York
Friday, June 7, 2024

Buy now

spot_img

नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व जिल्हा मेळाव्याचे माजलगांव येथे आयोजन

🔶नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व जिल्हा मेळाव्याचे माजलगांव येथे आयोजन.

🔶कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.,,,
सुरेंद्र कावरे

परळी/प्रतिनिधी

महाराष्ट्र नाभिक महामंडळ बीड जिल्हा आयोजित नाभिक समाजातील १०वी १२वी व निट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जसे डॉक्टर,इंजिनिअर,वकील,नागरीसेवा, शासकीय निमशासकीय नोकरी मीळवलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करत आले आहे तरी यावर्षीही गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन दि.१० जून २०२४वार सोमवार रोजी सकाळी ११वा. वैष्णवी मंगल कार्यालय गजानन मंदिर रोड,माजलगाव येथे करण्यात आले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी,या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे तसेच बीड जिल्हाध्यक्ष दिलीप झगडे व महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डी.डी.राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणरावजी दळे यांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष भगवानराव वाघमारे हे राहणार आहेत तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे, प्रदेश सरचिटणीस पांडुरंग भवर, कर्मचारी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव सोलाणे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र भैय्या कावरे, बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर, मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे हे उपस्थित राहणार आहेत तरी बीड जिल्ह्यातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींनी व नाभिक समाजातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डी.डी.राऊत ,महाराष्ट्र नाभिक युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे ,बीड जिल्हाध्यक्ष दिलीप झगडे * यांनी केले आहे.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या