19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

राजकारणात सत्तेत असो वा नसो परंतु माझा कार्यकर्ता कुणाच्या दारात लाचार होऊन गेला नाही – सुरेश धस

राजकारणात सत्तेत असो वा नसो परंतु माझा कार्यकर्ता कुणाच्या दारात लाचार होऊन गेला नाही – सुरेश धस

आष्टी (प्रतिनिधी)
1997 सालापासून राजकारणात आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी जो जो कार्यकर्ता म्हणून माझ्याशी जोडला गेला तो आजही माझ्यावर जीवापाड प्रेम करतो शिवाय माझ्या राजकीय प्रवासात मी सत्तेत असो अथवा नसो मात्र हा कार्यकर्ता कायम माझ्यासोबत राहिला आणि आहे तो लाचार होऊन कुणाच्या दारात गेला नाही.म्हणून मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो असे मत माजी मंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केले.तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी,आष्टी शहर, मुर्शदपुर व धामणगाव गणात आयोजित जनसंवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना धस म्हणाले की,कुणी किती मोठा झाला असेल,कुणी कितीही संपत्ती कमावलेली असेल मी मात्र माझ्या राजकीय जीवनात जीवा भावाची माणसं कमावली.म्हणूनच आष्टी मतदार संघात प्रत्येक बूथ वर माझा माणूस तुम्हाला दिसतो हीच माझी खरी ताकद आहे.सध्या मतदार संघात अनेक विधानसभेसाठी उत्सुक आहेत माझे वैयक्तिक मत आहे सर्वांनी उभे राहिले पाहिजे म्हणजे ज्याला त्याला आपली कुवत काय आहे ही लक्षात येईल.सध्या मतदार संघात ज्याची ग्रामपंचायतला निवडून यायची लायकी नाही तो विधानसभा लढविन्याचे स्वप्न पाहत आहे. 33 वर्षाच्या राजकारणात माणसं कमावली ती टिकवली म्हणून त्यांच्या एक निष्टतेला माझा सलाम असल्याचे मत व्यक्त करताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन देखील धस यांनी शेवटी केले.
यावेळी पारगाव जोगेश्वरी मेळाव्यात
सभापती बद्रीनाथ जगताप,माजी जि.प.सदस्य नवनाथ चखाले,गणेश शिंदे,माजी सभापती दत्ताभाऊ जेवे, ह.भ.प.अशोक महाराज भोसले, माजी सरपंच चेअरमन गणेश मोकाशे,अँड.बाळासाहेब झांबरे,सरपंच संदिप खेडकर, सरपंच पोपट शिरोळे, सरपंच शांतीलाल काटे, पांडुरंग कुमकर,शकीलभाई कुरेशी, शिवाजी आवारे,चंद्रकांत भोसले,वसंत भोसले,आजिनाथ भोसले,वजिर भाई पठान, सुरेश सातपुते, संजय जेवे, ललीत जेधे -विष्णु खाडे, संभाजी कोकणे, शिवाजी आवारे – सखाराम बळे, माजी सरपंच निळकंठ खेडकर,तात्यासाहेब बळे, मा.सरपंच भाऊसाहेब सुरवसे, अशोक राऊत, धनश्याम खाडे, बाळासाहेब मोकासे बापू, बाळासाहेब खेडकर आवारे साहेब, सूर्यकांत मोकासे, बाबु बोराडे,बारकू टेलर
तर आष्टी शहर व मुर्शदपुर गण या मेळाव्यात व्यासपीठावर नगराध्यक्ष जिया बेग,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,माजी सरपंच बन्सी भाऊ पोकळे, चेअरमन शांतीलाल भोसले,रमेश पवळे,खंडू दादा जाधव,बळे काका,दीपक निकाळजे, राहुल मुथ्था,टाटा शेठ
धामणगाव गणातील मेळाव्यास माजी सभापती शत्रुघ्न मरकड,माजी चेअरमन संजय गाढवे,सरपंच मनोज गाढवे,सरपंच दत्तात्रय खोटे,सरपंच नंदकिशोर करांडे,सरपंच विनायक मुळीक,उपसरपंच डॉ.अकिल सय्यद,सरपंच खंडू हाके,सरपंच संजय महाजन ,नामदेव काकडे,माजी उद्धव बेद्रे, बाबू भैय्या गर्जे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे तालुकाध्यक्ष गेनबा साळवे,सदाशिव घुमरे,रवी वायकर,नारायण वणवे,धनंजय तरटे,दादासाहेब वनवे,गोवर्धन तळेकर, निलेश पोकळे यांच्यासह प्रत्येक गणातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी,नागरिक,महिला भगिनी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या