सहकार प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
शालेय विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप
आष्टी प्रतिनिधी- वाढदिवसानिमित्त नाहक खर्च करण्यापेक्षा तो खर्च होणारा पैसा सत्कार्यासाठी लावला तर त्यामुळे अनेकांच्या काही अंशी अडचणी कमी होऊ शकतात. हाच विचार करून सहकार प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. आष्टी तालुक्यातील काही मिञाचा वाढदिवस मुलांना शालेय साहित्य वाटून होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत सहकार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने युवा उद्योजक महेश हंबर्डे, युवा नेते नानासाहेब ढोरमारे, मा सरपंच व महावितरण चे शिवाजीराव मार्कंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा विनाकारण खर्च टाळून समाजिक बांधिलकी जपत आष्टी येथील जिल्हा परिषद शाळे व पंचायत समिती शाळा मध्ये विद्यार्थासाठी शालेय साहीत्य वाटप केले. या वेळी युवा उद्योजक महेश हंबर्डे, युवा नेते नानासाहेब ढोरमारे व महावितरण चे शिवाजीराव मार्कंडे यांच्यासह इंजिनियर चंद्रकांत धस ,समिर पोकळे, अॅड. शरद कदम, प्रशांत द्वारके, माऊली गोरे, गणेश पोकळे, वैजिनाथ डहाळे, मयुर आधापुरे, विशाल शेट्टी, निलेश सोनवणे, स्वप्निल नखाते, सचिन भोगाडे, साबेर बेग सह सहकार प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते